मुंबई : राज्यात (Maharashtra) कोरोना लसीकरणाचा (Corona vaccination) नवा विक्रम नोंदवला गेला आहे. आज मोठ्यासंख्येने लस दिली गेली. राज्यात आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात आज एकाच दिवशी तब्बल 5 लाख 52 हजार 909 जणांना लसीकरण करून घेतली. आतापर्यंतचा हा उच्चांक नोंदविण्यात आला आहे.
एकाच दिवशी तब्बल 5 लाख 52 हजार 909 जणांनी कोरोना लस घेतल्याने आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे 2 कोटी 85 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
राज्यात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. आज एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांनी अभिनंदन केले pic.twitter.com/zHoaGtaFML
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 22, 2021
आज दिवसभरात 5 लाख 52 हजार 909 नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री 8 वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी 26 एप्रिल रोजी एकाच दिवशी 5 लाख 34 हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.