मुंबई : कोरोना व्हायरस Coronavirus चा संसर्ग दिवसागणिक अधिकत फोफावताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवातही केली आहे. राज्य एकिकडे unlock अनलॉकच्या टप्प्यात असतानाच दुसरीकडे मात्र कोरोना रुग्णसंख्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळं आता जनतेला कळेल अशाच शब्दांमध्ये कोरोनासंदर्भातील जनजागृती करण्यात येत आहे.
नागरिकांना काही महत्त्वाच्या गोष्टी नजरेत आणून देण्यासाठी थेट चित्रपटांचाही आधार घेतला जात आहे. बरं चित्रपटही कोणता, कर शोले.
हिंदी चित्रपट विश्व खऱ्या अर्थानं गाजवणाऱ्या 'शोले' या चित्रपटाच्याच आधारे अगदी तसाच 'गब्बर' एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आला आहे. हा गब्बर चक्क वऱ्हाडी भाषेत बोलत आहे.
सोशल मीडियावर तर हा व्हिडिओ धुमाकुळ घालत आहे. 'डाकू डबलसिंग झाला अकलसिंग' नावाचा हा लघुपट कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी साकारण्यात आला आहे. लघुपट अधिक प्रभावी करण्यासाठी यामध्ये वऱ्हाडी भाषेतील डायलॉग्सचा तडका देण्यात आला आहे.
कोरोना म्हणजे नेमकं काय, त्याचा संसर्ग कसा फोफावतो ही माहिती या लघुपटातून देण्यात आली आहे. तेव्हा आता नागरिकांना कळेल अशा त्यांच्याच भाषेत देण्यात आलेला हा संदेश पाहता ही शक्कल कोरोनावर मात करायला कितपत फायद्याची ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.