रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढतोय, 2586 बेड तयार

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. आता शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे.  

Updated: Apr 2, 2021, 03:26 PM IST
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढतोय, 2586 बेड तयार title=
संग्रहित फोटो

रत्नागिरी : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. पुणे, मुंबईसह अनेक मोठ्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भावर होत आहे. आता शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे त्या प्रमाणात उपाययोजना वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. कोविड (covid-19) रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. आजच्या घडीला 2586 बेड तयार ठेवण्यात आले आहेत.  तसेच जिल्ह्यातील 29 कोविड केअर सेंटर  ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

 कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. रत्नागिरी  जिल्ह्यातील 29 कोविड केअर सेंटर  ताब्यात घेण्याबाबत येत आहेत. या केअर सेंटरमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असणारे रुग्ण ठेवले जात आहेत. त्यासाठी 1665 बेडची  स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोकणात शिमगा उत्सव  सुरु झाला आहे. तसेच  गुढी पाडवा लक्षात घेता, खबरदारी घेण्यात येत आहे. 

संभाव्य कोरोनाच्या रुग्णांची स्थिती लक्षात घेता ही प्रशासनाने तयारी केली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतलेल्या 'टास्क फोर्स'च्या बैठकीमध्ये आरोग्य विभागालाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच  शासकीय रुग्णालयात ही स्टाफची कमतरता लक्षात घेता पुन्हा स्टाफची भरती करण्याबाबतचे आदेश संबंधितांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान,  कोरोनाचीची लक्षणे सौम्य असली तरी  त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत  आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका कायम आहे.  दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात 22 टनाचा ऑक्सिजनचा साठा होता. अजून वाढीव  लागल्यास तो ही ठेवण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे पूर्वी घेतलेली कोविड सेंटरही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बी. एड. कॉलेजचे होस्टेल, सामाजिक न्याय भवन, तसेच आवश्यक वाटल्यास शाळा ही ताब्यात घेतल्या जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. वाढता संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

तसेच खासगी डॉक्टरांनी सर्दी, ताप याचे रुग्ण आले तर त्याची नोंद करुन शासकीय रुग्णालयात पाठवण्याच्या सूचनाही संबंधिताना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 620 झाली आहे.  दिवसाला जवळजवळ 50 च्यावर रुग्ण सापडत असल्याने सगळ्यांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान 1 एप्रिल पासून 45 वर्षावरील लोकांना कोविडची लस देण्याची मोहीम सुरु झाली आहे. जिल्ह्यात साधारण 6 लाख लसचे डोस लागणार आहे.