Coronavirus : नाशिकमध्ये तब्बल सव्वातीन लाख रुपयांची दारू चोरली

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय कार्यालयात चोरी 

Updated: Apr 12, 2020, 02:20 PM IST
Coronavirus :  नाशिकमध्ये तब्बल सव्वातीन लाख रुपयांची दारू चोरली title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  राज्यात असलेल्या लोकांमुळे सध्या दारूला सोन्याचे भाव आले आहेत हजार रुपये मोजूनही दारू मिळत नसल्याने चोरांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाचा गोदामं फोडलंय.. नाशिक शहरातील पेठ रोड परिसरात आरटीओ कार्यालयात बाजूला पाच जिल्ह्यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय कार्यालय आहे.

 राज्य राखीव दलाच्या आवारातया कार्यालयात पाच जिल्ह्यात मारलेल्या जपानमध्ये जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यात येतो या ठिकाणी एकूण 64 बॉक्स ठेवण्यात आले होते यातील तीन लाख 26 हजार रुपयांची विदेशी दारू तसंच विस्कीच्या बॉटल चोरांनी रात्रीतून पसार केल्या. गेल्या पाच दिवसांपासून दररोज काही बॉक्स रात्री सुनियोजितपणे चोरी केले जात होते. शुक्रवारी रात्री अशाच पद्धतीने चोरी सुरू असताना पोलिसांनी एकाला बॉक्स सह जणांना रंगेहात पकडले. त्याने सांगितल्यानुसार पोलिसांनी कार्यालयातील या गोदामात अहि तपास केला असता एक जण बाथरूम मध्ये लपून असलेला आढळून आला. त्यानंतर ही चोरी होत असल्याचं समोर आलं तोपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत थांगपत्ता नव्हता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी जाऊन चोरीचा आढावा घेतला. 14 दिवसाचे लोक डाऊन आता 30 एप्रिल पर्यंत वाढल्याने शरीरामध्ये दिवसेंदिवस अस्वस्थता वाढते आहे . परिणामी राज्यांमध्ये राज्य उत्पादन कार्यालय सोबत वाइन कार्यालयास सोबत वाईन शॉप सुद्धा लक्ष होऊ शकतात...