लॉजवर भेटण्यास नकार दिला, विवाहितेचा आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवला

आरोपीने विवाहितेला भेटायला बोलावलं, पण तिने नकार देताच त्याने उचललं संतापजनक पाऊल

Updated: Jun 7, 2022, 05:39 PM IST
लॉजवर भेटण्यास नकार दिला, विवाहितेचा आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवला title=

जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती : लॉजवर भेटण्यास नकार देणाऱ्या विवाहितेचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. 

आरोपीने या विवाहितेशी सहमतीने शरीर संबंध प्रस्थापित करताना व्हिडीओ आणि फोटो काढले होते. त्यानंतर पुन्हा तिला लॉजवर येण्याची मागणी केली. पीडितेने नकार दिल्याने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सअॅप स्टेटला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 
याप्रकरणी आरोपीवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील सांगवी परीसतील वस्तीवर राहणाऱ्या विवाहित महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मण मच्छिंद्र वीर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

आरोपी हा औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील रांजणगाव इथला रहिवासी आहे. आरोपीची बहिण 26 वर्षीय फिर्यादी महिलेच्या शेजारी राहत होती. तो बहिणीकडे सप्टेंबर 2021 मध्ये आला असताना दोघांची ओळख झाली. तिचा पती कामाला गेल्यावर आरोपी तिच्या घरी बसण्यासाठी येत होता. यातून त्याने तिच्याशी गोड बोलून शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या.

फेब्रुवारी 2022 मध्ये तो त्याच्या गावी निघून गेला. त्यानंतर एप्रिल महिन्यात आरोपीने फोन करत फिर्य़ादीला लॉजवर भेटायला बोलावलं. तिला त्याच्याशी संबंध ठेवायचे नसल्याने तिने भेटण्यास नकार दिला. त्याच दिवशी त्याने तिला दोघांचे नग्न फोटो पाठवले. तसेच तु जर मला न भेटल्यास फोटो तुझ्या पतीला आणि भावाला पाठविण्याची धमकी दिली. 

त्यानंतर काही वेळातच त्याने तिच्यासोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओ तिला पाठवला. तरीही फिर्यादीने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर 27 मे रोजी त्याने स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला दोघांचे विवस्त्र अवस्थेतील फोटो ठेवले. पीडितेने त्याचा स्क्रीनशॉट काढत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत.