उस्मानाबाद : Neelam Gorhe - Criticize Chief Minister Uddhav Thackeray and get security : आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना आमने-सामने येणार आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याऱ्याला सुरक्षा मिळत आहे. केंद्र सरकारची नवीन सुरक्षा योजना आहे, अशी उपरोधीत टीका नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडी सरकारवर टीका करणाऱ्याला केंद्र सरकारने सुरक्षा पुरवत आहे. याबाबत शिवसेना नेत्या तथा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या बोलत होत्या.
अभिनेत्री कंगना रानौत, खासादर नवनीत राणा, भाजपचे नेते किरीट सोमय्या हे या योजनेचे लाभार्थी असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. ज्या व्यक्तींना संरक्षण हवे आहे ते मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतात. आता टीका करा आणी y दर्जाची सुरक्षा मिळावा , अशी योजना आहे, असे त्यांनी कोपरखळी मारली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुरक्षेची गरज नसल्याचे त्या म्हणाल्या. विकासाच्या प्रश्नापासून लक्ष दुसरीकडे वळविण्यात येत आहे. तसेच समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मशीदिवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठण हा मुद्दा समोर आणला आहे. हा प्रश्न प्रतिष्ठेचा करु नये, असा सल्ला राज ठाकरे यांना त्यांनी दिला आहे. पक्षाने आदेश दिल्यास अयोध्येला जाऊ, असे त्या म्हणाल्या.
उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे संभाजीनगर हे नाव बदलण्यासाठी अनेक ठराव शिवसेनेने मांडलेत. मात्र केंद्र सरकारच्या दुजाभाव आणि दुटप्पी भूमिकेमुळे हे नामकरण होत नसल्याची टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली. नामंतरण करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे. नामकरण ही लोकाभवना असून दिल्लीतील रस्त्याची आणि हैद्राबादचे भाग्यनगर हे नामकरण होते. मात्र महाराष्ट्राबाबत दुजाभाव केला जातो, केवळ राजकारणासाठी भाजपचे हिंदुत्व आहे, असे त्या म्हणाल्या.