लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी, पोलिसांनी भुशी धरणावरुन पर्यटकांना हुसकावून लावले

लोणावळ्यात  विकेंडच्या दिवशी पर्यंटकांनी गर्दी केली आहे. कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने पोलिसांनी पर्यंटकांना हुसकावून लावले आहे. (Tourist in Lonavala)

Updated: Jun 19, 2021, 05:00 PM IST
लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी, पोलिसांनी भुशी धरणावरुन पर्यटकांना हुसकावून लावले title=

लोणावळा : लोणावळ्यात विकेंडमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. भुशी डॅम, टायगर पॉईंट, सहारा ब्रिज, लायन्स पॉईंट या पर्यटनस्थळी जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने रायवूड पोलीस चौकी ते लोणावळा शहरा पर्यंत वाहनांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. (Tourist crowd on Bhusi Dam) 

पर्यटनावर बंदी असताना ही राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक लोणावळ्यात दाखल होत आहेत. गर्दी होत असल्याने पोलिसांकडून कारवाई देखील होत आहे. आज सकाळपासून भुशी धरणावर पर्यटक येऊ लागले होते. पण काही मिनिटांतच पोलीस तेथे दाखल झाले आणि पर्यटकांना धरण परिसरातून हुसकावून लावले. 

लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने लोणावळा ( Lonavala ) शहर पोलिसांनी सतर्कता दाखवली. लोणावळ्यातील भुशी धरणावर आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी हुसकावून लावलं. पर्यटनबंदी असल्याने पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. 

पर्यटकांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाचे नियम तर पाळलेच पाहिजे. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका डोक्यावर असताना अशाप्रकारे अनावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडणं टाळलं पाहिजे.