सावधान, whats app आलेली ही लिंक ओपन करु नका, अन्यथा तुमचे बँक खाते होईल खाली

वाढलेल्या बरोजगारीचा फायदा काही सायबर चोरटे नेहमीच घेण्याच्या तयारीत असतात. असाच काहीसा प्रकार आता थेट पंतप्रधान यांच्या नावाने सुरु आहे. 

Updated: May 31, 2021, 03:22 PM IST
सावधान, whats app आलेली ही लिंक ओपन करु नका, अन्यथा तुमचे बँक खाते होईल खाली title=
संग्रहित छाया

आशिष अंबाडेसह विशाल करोळे / चंद्रपूर ,औरंगाबाद : वाढलेल्या बरोजगारीचा फायदा काही सायबर चोरटे नेहमीच घेण्याच्या तयारीत असतात. असाच काहीसा प्रकार आता थेट पंतप्रधान यांच्या नावाने सुरु आहे. 'प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता'ची एक लिंक व्हाट्सअॅप वर  (whats app ) फिरत आहे. त्यातून ते साध्य करण्यासाठी एनी डेस्ट टीम व्हूवर अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येत आहे. यातून तुम्हाला मोठा फटका बसू शकतो आणि तुमचे बँक खाते काही मिनिटात खाली होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या. व्हाट्सअॅपवरुन आलेली अशी लिंक कोणीही ओपन करु नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बेरोजगारांना फसवण्यासाठी आता थेट पंतप्रधानांच्या नावाचा उपयोग सुरु असल्याचे आता पुढं आलं आहे, यासाठी तुम्ही बेरोजगार असाल तर तुमची माहिती एका वेबसाईटवर भरण्यास सांगण्यात येते. त्यासाठी तुम्हाला कॉलही करण्यात येतो.  तुम्हाला दरमहा 2500 ते 3500 रुपयापर्यंत बेरोजगार भत्ता मिळेल असेही सांगण्यात येत आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला एक अॅप डाऊनलोड करायचं आहे असं सांगण्यात येते. एनी डेस्क नावांच हे अॅप आहे, हे एक क्लोनिंग अॅप आहे. हे अॅप कसं डाऊनलोड करायचे याचीही माहिती हे भामटे देत असतात. 

खर तर ज्या लिंकवर बेरोजगारांना माहिती भरायला सांगण्यात येत आहे. ती लिंक बनावट आहे. त्यातून भामटे आपले कॉनट्क्ट डिटेल्स घेवून तुम्हाला फसवतात. नक्की हे भामटे कसं तुमचा मोबाईल फोन क्लोन करतात याचं प्रात्यक्षिकच सायबर पोलिसांनी करुन दाखवलं. याद्वारे भामटे अगदी तुमच्या गूगल पे पर्यंत सुद्धा सहज पोहोचतात. फक्त औरंगाबादेत नाही तर राज्यभरात असले प्रकार सुरु आहेत. चंद्रपूर पोलिसांनी तर याबाबत स्वत: गुन्हा दाखल केला आहे आणि असल्या साईट्सवर कारवाई व्हावी म्हणून त्यांनी गूगल सोबत सुद्धा पत्रव्यवहार सुरु केला आहे.

 बरोजगारांना फसवण्याचा हा भामट्यांचा नवा फंडा आहे, फक्त याच माध्यमातून नाही तर इतर आमिष दाखवून सुद्दा एनी डेस्क अॅप डाऊनलोड करून तुमचा फोन ही लोक हॅक करु शकतात त्यामुळे सगळ्यांनीच या सगळ्या गोष्टींपासून सावधान राहण्याची गरज आहे, अन्यथा फसवणूक अटळ आहे.