Cyclone Biporjoy : मान्सूनची वाटचाल वेगानं सुरु झालेली असतानाच हवमानशास्त्र विभाग मात्र समुद्रातील हालचालींवर करडी नजर ठेवून आहे. कारण, ठरतंय ते म्हणजे सक्रिय असणारं बिपरजॉय हे चक्रिवादळ. मागील काही दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या या वादळानं मागील दोन दिवसांणध्ये रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आणि शनिवारी वादलाचे परिणाम दिसून येऊ लागले. येत्या 24 तासांत हे वादळ आणि तीव्र होणार असून, त्या धर्तीवर सध्या केरळातील काही जिल्यांना जिल्ह्यांना हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्याच्या समुद्रातही उंच लाटा उसळणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
आयएमडीनं ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार 9 जून 2023 रोजी बिपरजॉय चक्रिवादळानं अतीरौद्र रुप धारण केलं. जे पुढील 24 तासांमध्ये उत्तर-उत्तर पूर्व दिशेनं पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रिवादळाच्या धर्तीवर अरबी समुद्रकिनारपट्टी क्षेत्रात येणाऱ्या वलसाड येथील तिथल किनाऱ्यावरही उंचच उंच लाटा उसळण्यास सुरुवात झाली. ही संपूर्ण परिस्थिती पाहता हा समुद्रकिनारा 14 जूनपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
#WATCH | Gujarat: High waves are seen at Tithal beach of Valsad ahead of Cyclone Biparjoy.
Tithal Beach was closed for tourists as a precautionary measure by the Valsad administration following the cyclone Biparjoy warning (9/06) pic.twitter.com/TSvQfaiezv
— ANI (@ANI) June 10, 2023
तिथे केरळातील तिरुवअनंतपूरम, कोल्लम, पाथनमथिट्टा, अलापुझ्झा, कोट्टायम, इडुक्की, कोझिकोडे आणि कण्णूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तिथं केरळात मान्सूनही सुरु झाल्यामुळं आता या राज्याला पावसाचा तडाखा बसण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, सध्या बंगालच्या उपसागरात आणखी एका नव्या चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात येत आले. परिणामी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनला गती मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. इथे महाराष्ट्रात या सर्व परिस्थितीचे पडसाद पूर्वमोसमी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या रुपात पाहायला मिळत आहेत. सध्या कोकणासह अलिबाग परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मात्र हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळं उन्हाचा दाह सोसेनासा होत आहे.