चक्रीवादळ तडाखा : रायगड येथे गेलेल्या महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

 चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता येथील १४ कर्मचारी काम करण्यासाठी गेले होते. यापैकी तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Updated: Jul 4, 2020, 11:16 AM IST
चक्रीवादळ तडाखा : रायगड येथे गेलेल्या महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
संग्रहित छाया

वर्धा : निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला. घरांसह विद्युत खांबांचे मोठे नुकसान झाले होते. गेले अनेक दिवस विद्युत पुरवठा बंद होता. रायगड येथे चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता येथील १४ कर्मचारी काम करण्यासाठी गेले होते. यापैकी  महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

महावितरण कर्मचारी १६ मे रोजी रायगडला गेले होते.  एक जूनला ते माघारी परतले. त्यानंतर त्याच्या घशाचा नुमूणे घेण्यात आले होते. यावेळी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आंजी (मोठी) , पिपरी (मेघे) आणि वर्धा शहरातील हे कोरोना लागण झालेले कर्मचारी आहे. त्यामुळे या ठिकाणीही आरोग्य यंत्रणेने खबरदारी घेतली आहे.

 ११ जणांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. यापैकी १२ लोकांनी कोरोनावर मात केली आहे तर एका महिलेचा मृत्यू झाला असून ९ लोकांवर उपचार सुरु आहेत.