डी.एस.कुलकर्णींचं आता 'दे रे दे रे पैसा'

अडचणीतल्या व्यवसायासाठी डीएसके क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसा उभारणार आहेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 9, 2018, 02:06 PM IST
डी.एस.कुलकर्णींचं आता 'दे रे दे रे पैसा' title=

पुणे : अडचणीत आलेल्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी 'दे रे दे रे पैसा' हा मार्ग अवलंबला आहे. अडचणीतल्या व्यवसायासाठी डीएसके क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसा उभारणार आहेत. 

सामान्य नागरिकांनी पैसे देण्याचं आवाहन

ग्लोबल सेतू फाऊंडेशनच्या माध्यमातून ते आर्थिक मदत गोळा करणार आहेत. यासाठी सामान्य नागरिकांनी पैसे देण्याचं आवाहन डीएसकेंनी केलं आहे.

आपल्या व्यवसायाची स्थिती मजबूत

प्रगत देशांत क्राऊड फंडींग यशस्वी झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. आजही आपल्या व्यवसायाची स्थिती मजबूत असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुन्हा नव्या दमाने उभं राहणार असल्याचा विश्वासही डीएसकेंनी व्यक्त केला आहे. सर्वसामान्यांमध्ये आजही डीएसकेंबद्दल मोठ्या प्रमाणात सहानुभूती आणि आदर दिसून येतो हे विशेष.