dahi handi 2024 : वरळी मतदारसंघाचं राजकारण पुन्हा तापणार असल्याचं चित्र दिसतंय. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भाजपकडून दरवर्षी जांबोरी मैदानावर दहीहंडी फोडली जाते. या दहीहंडीला राजकीय रंगही दिला जातो. यंदा 'अफजल खानचा वध' मानवी मनो-याच्या माध्यमातून दाखवला जाणार असल्याने सगळ्यांचं लक्ष या दहीहंडीकडे लागले आहे.
मुंबईत दहीहंडीवरुन राजकारण
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. त्यातच आता दहीहंडीवरून राज्यातलं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी आगामी विधानसभेच्या विजयाची हंडी फोडली. येत्या निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा विश्वास शिंदे आणि शेलारांनी व्यक्त केलाय. ही विजयाची हंडी फोडल्यावरून राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटल्यात. संजय राऊतांनी या कार्यक्रमाचा आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतलाय.

येत्या काळात भाजप विरुद्ध आदित्य ठाकरे हा राजकीय संघर्ष तापण्याचीही चिन्हं आहेत. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात सक्रीय होऊन भाजपनं रणनीतीला सुरुवात केल्याचं बोललं जातंय. वरळीच्या जांबोरी मैदानावर भाजपनं दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात अफजलखानाच्या वधाचा देखावा साकारण्यात आला होता. येत्या निवडणुकीसाठी हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे करणार असल्याचे संकेत भाजपनं दिल्याची चर्चा आहे. यावरून आदित्य ठाकरेंनी भाजपला जोरदार टोला लगावलाय.
मुंबईत भाजप विरुद्ध आदित्य ठाकरे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हं आहेत... आदित्य ठाकरेंना त्यांच्याच वरळी मतदारसंघात मात देण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्यात. दुसरीकडे राज ठाकरेंनीही वरळीत मनसे उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळं वरळीतली लढत आदित्य ठाकरेंसाठी निश्चितच सोपी राहिलेली नाही. त्यामुळे विजयाची हंडी कोण फोडणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल.