धक्कादायक, ऑनलाईन गेममुळे १७ वर्षीय मुलीची आत्महत्या!

१७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. आत्महत्येपूर्वी हाताच्या मनगटावर लिहिलेल्या इंग्रजी वाक्यामुळे ही आत्महत्या एखाद्या ऑनलाईन गेममुळे करण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय. 

Updated: Dec 6, 2018, 11:07 PM IST
धक्कादायक, ऑनलाईन गेममुळे १७ वर्षीय मुलीची आत्महत्या!

नागपूर : १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. आत्महत्येपूर्वी हाताच्या मनगटावर लिहिलेल्या इंग्रजी वाक्यामुळे ही आत्महत्या एखाद्या ऑनलाईन गेममुळे करण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय. 

मानसी असे या मुलीचं नाव आहे. तिचे वडील वायुसेनेतून निवृत्त झालेत तर आई खासगी शाळेत शिक्षिका आहे. मानसीला १० वीत ७५ टक्के गुण मिळाले. त्यानंतर अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने ती गेल्या सहा महिन्यापासून घरीच होती. 

आत्महत्या करण्यापूर्वी तिने मनगटावर कट 'हिअर टू एक्झिट' असं इंग्रजीत मनगटावर लिहीलं होतं. मानसी सतत मोबाईलवर गेम खेळत असे. त्यामुळे या आत्महत्येचं कारण एखादा गेम नाही ना याचा शोध पोलीस घेत आहेत.