सुनेचा सासू आणि नंदेवर धारदार शस्त्राने हल्ला; बदलापुरमधील धक्कादायक प्रकार

एका सुनेने सासुसह नंदेवर कोयत्याने वार केले आहेत. बादलापूर येथे घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Updated: Aug 19, 2023, 06:59 PM IST
सुनेचा सासू आणि नंदेवर धारदार शस्त्राने हल्ला; बदलापुरमधील धक्कादायक प्रकार  title=

Badlapur Crime News : सुनेने  सासू आणि नंदेवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे.  बदलापुरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत आरोपी महिलेची नणंद आणि सासू दोघी गंभी जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  कौटुंबिक वादातून  सुनेने सासू आणि नंदेवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. 

काय घडलं नेमकं?

बदलापुर गावातील कुंभारवाड्यात घटना घडली आहे. सुनेने सासू आणि नणंदवर कोयत्याने प्राण घातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बदलापूर गावातील कुंभारवाड्यात राहणारे सीता गायकर यांचे पती आजारी असल्याने त्यांची मुलगी राजश्री डायरे ही त्यांना बघण्यासाठी माहेरी आली होती. हे दोघेही सकाळी पाच वाजेपर्यंत वडिलांचे शेजारी बसले असतांना त्यांचा पहाटे पाच वाजता सुमारास डोळा लागला. त्याच वेळेस त्यांची सून वैशाली गायकर हिने धारदार शस्त्राने या दोघांवर हल्ला केला यात सीता गायकर आणि राजश्री यांच्या डोक्याला हाताला गंभीर दुखापत झाली असून या दोघींवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून घरात कौटुंबिक वाद सुरू असून या प्रकरणी अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 

कौटुंबिक वादातून नंदेचा गर्भपात घडवून आणण्यासाठी अघोरीं कृत्य आणि जादूटोणा

कौटुंबिक वादातून नंदेचा गर्भपात घडवून आणण्यासाठी अघोरीं कृत्य व जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार विरार जवळच्या मांडवी पोलीस ठाणे हद्दीत घडला होता. या प्रकरणी पतीनेचं आपल्या पत्नी व भगता विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. येथील गावात राहणाऱ्या सदर आरोपी महिलेचे घरात पतीच्या बहिणीसोबत म्हणजेचं नंदेसोबत कौटुंबिक भांडण सुरू होते. त्यातच नणंद गर्भवती असल्याचे समजल्यानंतर वैयक्तिक आक्सापोटी तिने जवळच्या जादूटोणा व अघोरी विद्या करणाऱ्या भगताला तिने गर्भपात करायला सांगितला आणि त्यासाठीचे पैसे तिने भगताला ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. आरोपी पत्नीच्या पतीला हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने तिच्या मोबाईल मधले कॉल रेकॉर्डिंग ऐकले व त्या आधारे मांडवी पोलिसात जाऊन आरोपी पत्नी विरोधात तक्रार दाखल केली. मांडवी पोलिसांनी ही ऑडिओ क्लिप एकूण त्या आधारे आरोपी महिलेवर महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला.