अपघाताचा दिवस : एकाच दिवशी 6 जण ठार तर 19 जण जखमी

एकाच दिवशी तीन ठिकाणी अपघात 

Updated: Dec 25, 2019, 02:29 PM IST
अपघाताचा दिवस : एकाच दिवशी 6 जण ठार तर 19 जण जखमी  title=

मुंबई : आज नाताळचा दिवस सगळीकडे एक वेगळा उत्साह आहे. मात्र महाराष्ट्रातल्या तीन ठिकाणी मात्र हा अपघाताचा दिवस ठरला. सकाळी सुरूवात झाली तीच अपघाताच्या बातमीने. तळेगाव-दाभाडे येथे पहाटे 4 च्या सुमारास शालेय सहलीचा बस अपघात झाला. त्यानंतर औरंगाबाद येथे ऑटो रिक्षा आणि कारचा अपघात झाला. तर मुंबईतील नालासोपाऱ्यात घंटागाडी आणि बाईची धडक झाली. 

औरंगाबाद जालना रस्त्यावर शेकटा गावाजवळ अपघात झाला आहे. कार आणि ऑटो रिक्षा समोरासमोर धडकले आहेत. या अपघातात 4 जण ठार तर 1 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 2 पुरुष, 1 महिला आणि एका मुलाचा देखील सहभाग आहे. तर नालासोपाऱ्यात घंटागाडीची बाईकला धडक झाली आहे. यामध्ये बाईकस्वार असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही वसई-विरार मनपाची घंटागाडी होती. 

संगमनेरच्या बी. जे. खताळ शाळेच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. तळेगावाजवळ सहलीच्या बसने ट्रॉलीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात शाळेचे 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक जखमी झाले आहेत. सहलीची बस परतत असताना बसला अपघात झाला आहे. महत्वाचं म्हणजे बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला सहलीच्या बसची धडक बसली आहे. 

तळेगाव-दाभाडे परिसरात हा अपघात झाला आहे. रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला बसनं धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. संगनेरमधील बी.जे.खताळ शाळेचे विद्यार्थी सहल संपवून परतत असताना पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. सहलीच्या बसनेच्या उसाच्या ट्रॉलीला धडक दिली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही मात्र 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक जखमी झाले आहे. या अपघातात चालकाची प्रकृती गंभीर जखमी आहे