नागपूर महापौर निवडणुकीत दयाशंकर तिवारी विजयी

भाजपचे  (BJP) दयाशंकर तिवारी (Dayashankar Tiwari) यांची महापौरपदी निवड झाली आहे.  

Updated: Jan 5, 2021, 04:15 PM IST
नागपूर महापौर निवडणुकीत दयाशंकर तिवारी विजयी  title=
संग्रहित छाया

नागपूर : भाजपचे  (BJP) दयाशंकर तिवारी (Dayashankar Tiwari) यांची महापौरपदी निवड झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवडणुकीत त्यानी काँग्रेसच्या (Congress) रमेश पुणेकर (Ramesh Punekar) यांचा पराभव केला. दयाशंकर तिवारी यांना 107 मतं मिळाली. (Dayashankar Tiwari win) तर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे रमेश पुणेकर यांना 27, तर बसपा नरेंद्र वालदे यांना 10 मते मिळाली. यावेळी पाच सदस्य अनुपस्थित होते. 

तिवारी नागपूरचे 54वे महापौर ठरले आहेत. महापालिका इतिहासात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने महापौरपदाची निवडणूक झाली. सर्व नगरसेचक मोबाईल आणि लॅपटॉपवरून निवडणुकीत सहभागी झाले होते.  दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. काँग्रेसकडून दोन अर्ज भरण्यात आले होते. मात्र, एक अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतला. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळाली. यात भाजपने बाजी मारली.

भाजपचे दयाशंकर तिवारी नागपूरचे नवे महापौर  झाले आहेत. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ऑनलाइन पद्धतीने महापौरपदाची निवडणूक झाली. सर्व नगरसेचक मोबाईल आणि लपटॉपवरून सहभागी झाले. भाजपचे  दयाशंकर तिवारी यांना 107 मते मिळवत निवडणुकीत बाजी मारली. दरम्यान, या निवडणुकीसाठी पाच सदस्य अनुपस्थित होते. यात आभा पांडे (अपक्ष), किशोर कुमेरिया (शिवसेना),  पुरषोत्तम हजारे (काँग्रेस), आणि बंटी शेळके (काँग्रेस) यांचा  समावेश आहे.

विजयी झाल्यानंतर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी राज्य शासनाने कट रचून  ऑनलाइन पद्धतीने निवडणूक करायला लावल्याचा आरोप त्यांनी केला. 

345 6\