तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या कॉलेज तरूणाचा मृत्यू

 तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या कॉलेज तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. यशवंत गोलपुडी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.

Updated: Aug 26, 2017, 06:27 PM IST
तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या कॉलेज तरूणाचा मृत्यू title=

पुणे : तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या कॉलेज तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. यशवंत गोलपुडी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.

तो मुळचा तेलंगणचा असून पुण्यातील सिंबॉयसिस कॉलेजचा विद्यार्थी होता. शुक्रवारी त्यांच्या कॉलेजचे ५१ विद्यार्थी तोरणा किल्लयावर ट्रेकींगसाठी गेले होते.

यावेळी तो गडावर असलेल्या तलावात पोहोण्यासाठी उतरला असता यशवंतचा बुडून मृत्यू झाला. मावळा जवान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढून गडाच्या पायथ्यापर्यंत आणला.