पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या 'वीरु' श्वानाचा मृत्यू

गेल्या आठ वर्षांपासून यवतमाळ पोलीस दलात अविरत सेवा बजावणाऱ्या 'वीरु' या श्वानाने अखेरचा श्वास घेतला. 'विरु' वर पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात शोक सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Updated: Mar 13, 2018, 05:07 PM IST
पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या 'वीरु' श्वानाचा मृत्यू
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ : गेल्या आठ वर्षांपासून यवतमाळ पोलीस दलात अविरत सेवा बजावणाऱ्या 'वीरु' या श्वानाने अखेरचा श्वास घेतला. 'विरु' वर पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात शोक सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. 

गुन्हे प्रकटीकरण आणि सुरक्षितता या दोन्ही बाबींमध्ये श्वान पथक हा विभाग महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असतो. 'विरु'ने प्रदीर्घ काळ पोलीस दलाची सेवा करताना अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले होते. 

अकोला बाजार इथे वर्षभरापूर्वी ७५० जिलेटीन कांड्या आणि ७५० डिटोनेटर शोधण्यात महत्वाची भूमिका विरु ने बजावली होती. गेल्या दोन महिन्यापासून पोलिस दलातील 'विरु' ची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. अशातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.