वालधुनी नदीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू

वालधुनी नदीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना येथे घडलीय. गणेश जैस्वार असं त्याचं नाव असून तो सहा वर्षाचा होता.

Updated: Jun 28, 2017, 10:52 PM IST
 title=

उल्हासनगर : वालधुनी नदीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना येथे घडलीय. गणेश जैस्वार असं त्याचं नाव असून तो सहा वर्षाचा होता.

पहिलीत शिकणारा गणेश मंगळवारी संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर घराजवळच असलेल्या वालधुनी नदीजवळ गेला. या नदीवरील जुना पूल पडल्यानं पालिकेनं नवीन पूल उभारण्याचं काम रामचंदानी नामक ठेकेदाराला दिलं होतं. मात्र हे काम निकृष्ट होत असल्याचं लक्षात आल्यानं पालिकेनं चार महिन्यांपासून काम थांबवलंय.

यामुळे नदी ओलांडण्यासाठी ठेकेदार आणि पालिकेनं नदीवर फळ्या टाकून मार्ग तयार केला होता. मात्र हा मार्ग धोकादायक असल्याने नागरिकांना या फळ्यांवरुनच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे नदीला आलेल्या पुरात हा कच्चा रस्ताही वाहून गेला. यावेळी गणेश नदीपात्राजवळ गेल्यानं पाण्यात वाहून गेला.