close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बीड येथे कुलरचा शॉक लागून नवविवाहितेचा मृत्यू

साफसफाई करताना चुकून कुलरला हात लागून वीजेचा शॉक लागल्याने नवविवाहितेचा मृत्यू झाला.  

Updated: Jun 5, 2019, 07:29 PM IST
बीड येथे कुलरचा शॉक लागून नवविवाहितेचा मृत्यू

 बीड : घरातील साफसफाई करताना चुकून कुलरला हात लागून वीजेचा शॉक लागल्याने एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे बुधवारी ही घटना घडली. कोमल संजय शेलार (19 ) असे या नवविवाहितेचा मृत्यू झाला. कोमलचा 24 मे रोजी जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी या गावी मादळमोही येथील संजय शेलारशी विवाह झाला होता. गुरुवारी त्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती. बुधवारी सकाळी उठल्यावर कोमल घरातील साफसफाई, सारवण करत होती. 

त्याचवेळी कुलरची देखील ओल्या कापडाने सफाई करत असताना विद्युत प्रवाह उतरला असल्याने शॉक लागला. यामध्ये तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही बाब कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.