चिपी विमानतळ हवाई चाचणीवर प्रश्नचिन्ह, केसरकरांची दिल्लीला धाव

 चिपी विमानतळ हवाई चाचणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Updated: Sep 9, 2018, 02:05 PM IST

सिंधुदूर्ग : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर होणाऱ्या चिपी विमानतळ हवाई चाचणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. चाचणीच्या परवानगीवरुन तांत्रिक पेच निर्माण झालाय. डीजीसीए म्हणते राज्य सरकार ही परवानगी देईल. मात्र कार्यान्वित विमानतळावरच हवाई चाचणीसाठी परवानगी देण्याचा अधिकार आहे असा दावा राज्य सरकारने केलाय. त्यामुळे हवाई परवानगी मिळवण्यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्लीला धाव घेतलीय.

परवानगीचा तांत्रिक पेच

हवाई चाचणीसाठी सर्व यंत्रणा तयार असून केवळ परवानगीचा तांत्रिक पेच असल्याचे केसरकरांनी म्हटलंय. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजेच १२ सप्टेंबरला चिपी विमानतळावर व्हीव्हीआयपी विमानाचे लँडिंग होणार होती.

या पहिल्या विमानातून सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युतीचे मंत्री प्रवास करणार होते. याआधी १० सप्टेंबरला विमानतळावर हवाई चाचणी होणार होती. मात्र परवानगीवरुन या चाचणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.