साडेतीन वर्षांत दिल्ली-मुंबई हायवेचे काम पूर्ण होईल- गडकरी

मुंबई ते दिल्ली हे अंतर 13 ते 14 तासांत पार करता येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

Updated: Nov 15, 2019, 11:14 AM IST
साडेतीन वर्षांत दिल्ली-मुंबई हायवेचे काम पूर्ण होईल- गडकरी  title=

मुंबई : पुढील साडेतीन वर्षांत दिल्ली-मुंबई हायवेचे काम पूर्ण होईल. त्यानंतर 13 ते 14 तासांत हे अंतर पार करता येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. देशात असे आणखी 3 हायवे बनवले जात आहेत. आम्ही नियोजन केलेल्या जल मार्गांच काम सुरू झालेलं आहे. यातून वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. रेल्वेला प्रति किलोमीटर 6 रुपये खर्च येतो, जल वाहतुकीला 1 रुपया लागतो. याशिवाय कोस्टल वेज तयार होत असल्याचे ते म्हणाले. 

100 नवीन विमानतळ उभारले जात आहेत. या सगळ्यातून औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. उद्योगाचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक वाहे. पुणे मुंबई बाहेर उद्योग वाढतील यासाठीची योजना सरकारने आखली आहे. कृषी, आदिवासी तसेच ग्रामीण क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून नवनवीन तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 

उद्योगाचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक असून पुणे मुंबई बाहेर उद्योग वाढतील यासाठीची योजना सरकारने आखली आहे. कृषी, आदिवासी तसेच ग्रामीण क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून नवनवीन तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक असल्याचे गडकरी म्हणाले.