दादांची पावर वाढणार! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लहान सुपुत्र जय पवार यांची राजकारणात एन्ट्री

राज्याच्या राजकारणात आणखी एका पवारांची एन्ट्री होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लहान सुपुत्र जय पवार राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

Updated: Aug 29, 2023, 04:00 PM IST
दादांची पावर वाढणार! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लहान सुपुत्र जय पवार यांची राजकारणात एन्ट्री title=

Ajit Pawar Son Jay Pawar :  उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लहान सुपुत्र जय पवार राजकारणात सक्रिय होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसे संकेतच जय पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिले. अजित पवारांच्या बारामतीतल्या सभेनंतर दोन दिवसातच राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाला जय पवार यांनी भेट दिली. या भेटीनंतर जय पवार राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगली आहे.  

पार्थ पवारांनंतर आता जय पवार यांचीही लवकरच राजकारणात प्रवेश

जय पवार राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात आले यावेळी त्यांना राजकारणात सक्रीय होण्याची गळ कार्यकर्त्यांनी घेतली. त्यावेळी जय पवार यांनी कार्यकर्त्यांना अजित दादांना भेटा त्यांनी ग्रीन सिग्नल दिला तर आपण तयारच आहोत असं सांगितलं. त्यामुळे पार्थ पवारांनंतर आता जय पवार यांचीही लवकरच राजकारणात एण्ट्री होणार असल्याचं दिसतंय. 

बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री सोबत फोटो व्हायरल झाल्यामुळे जय पवार आले होते चर्चेत 

बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला सोबत फोटो व्हायरल झाल्यामुळे जय पवार चर्चेत आले होते.  जय पवार हे  शरद पवार यांचे नातू आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. अजित पवार यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा पार्थ आहे. तर, जय हा त्यांचा लहान मुलगा आहे. पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय आहेत. पार्थ पवार यांनी मावळची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा दारूण पराभव झाला होता.  जय पवार बारामतीतील समाजकारणात सक्रीय आहेत. आता लवकरच जय पवार बारामतीच्या राजकारणात देखील सक्रिय होणार आहेत. 

बारामती लोकसभा कोण लढवणार याचा निर्णय अजित पवार घेणार 

बारामती लोकसभा कोण लढवणार याचा निर्णय अजित पवार घेणार आहेत. तशी माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिलीय.. तसंच राज्यातल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला महायुतीची बैठक प्रस्तावित असल्याचंही तटकरेंनी म्हटलंय. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता लागली आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाची... सध्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत.. तेव्हा अजित पवार गट बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं...