Maharastra Politics: फडणवीसांना जेलमध्ये टाका, 'या' अधिकाऱ्याकडे दिली होती जबाबदारी; आरोपाने खळबळ!

Devendra Fadanvis,big Accusation: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप लगावला आहे. बड्या अधिकाऱ्याला फडणवीसांच्या अटकेची (Fadnavis arrest) जबाबदारी देण्यात आली होती, असं ते म्हणाले.

Updated: Dec 30, 2022, 08:28 PM IST
Maharastra Politics: फडणवीसांना जेलमध्ये टाका, 'या' अधिकाऱ्याकडे दिली होती जबाबदारी; आरोपाने खळबळ! title=
Devendra Fadanvis, Uddhav Thackrey

Devendra Fadanvis : हिवाळी अधिवेशनामुळे (Nagpur Winter Session) सध्या राज्यातील राजकीय वातावरण (Maharastra Politics) तापल्याचं पहायला मिळतंय. गेल्या अनेक दिवसात अधिवशनात करण्यात येत असलेल्या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जोरदार पलटवार करताना दिसत आहेत. अशातच आता देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. फडणवीसांनी थेट महाविकास आघाडीच्या सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. (Devendra Fadanvis big Accusation in nagpur winter session plan on how to put me in jail marathi news)

प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना टार्गेट केलं गेलं होतं. मला देखील कसे जेलमध्ये टाकता येईल याचा प्लँन ठरला होता. संजय पांडे यांना (Sanjay Pandey) जबाबदारी दिली होती. कसंही करून फडणवीस यांना अडकवा, असं सांगण्यात आलं होतं. कंगना राणावतचे घर तोडण्यासाठी वकिलाला 80 लाख दिले गेले, असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे.

रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांना 13 दिवस जेलमध्ये टाकलं. आमच्या मंत्र्यांवर आरोप लावता आणि राजीनामा मागता, तुमचे मंत्री जेलमध्ये गेले तरी राजीनामा घेतला नाही, असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले. आमच्या मंत्र्यामध्ये चूक असेल तर राजीनामा (Resign) घेऊ, असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री यांच्यावर आरोप करून तुम्ही तोंडावर पडलात, असं म्हणत फडणवीसांची एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. कुठलीही शाळा बंद केलेली नाही. एक जरी शाळा बंद पडली तर ती जबाबदारी आमची, असं फडणवीस म्हणाले. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) व्यवस्था करा असं आपण सांगितलं जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा स्मार्ट स्टेट महामार्ग असेल, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. अपघात रहित असा महामार्ग असेल, टायर जुने असेल तर एका लिमिटेड स्पीडवर गाडी चालवावी, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय.

आणखी वाचा - Mumbai News: मुंबईतील Mount Mary Church लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर; बॉम्बने उडवण्याची धमकी!

दरम्यान, भविष्यात देखील अशा प्रकारची योजना अधिक चांगल्या प्रकारे करता येईल याचा आढावा घेऊ. फॉक्सकोनचे पॅकेज मान्य केलं नव्हतं आम्ही लगेच मंत्रीमंडल बैठक घेऊन लगेच पॅकेज मान्य केलं. पण आमचे सरकार आले आणि फॉक्सकाँन गेला असा आरोप केला, असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.