कोल्हापूर / शिर्डी / पंढरपूर : विद्यार्थ्यांना मिळालेल्या उन्हाळी सुट्या आणि सलग आलेल्या सरकारी सुट्यांमध्ये भाविकांनी धार्मिक स्थळांवर एकच गर्दी केलेली पाहायला मिळतेय. कोल्हापूरची अंबाबाई, शिर्डीचे साईबाबा आणि पंढरपूरचा विठोबा भाविकांच्या गर्दीत हरवून गेलेत. अंगाची लाही लाही करणाऱ्या प्रचंड उन्हातही भाविकांच्या रांगा वाढतानाच दिसत आहेत.
सुट्ट्यामुळे कोल्हापुरातही अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दी वाढलीय. इतर राज्यातल्या भाविकांचीही गर्दी वाढलीय. दर्शनाची रांग भवानी मंडपापर्यंत आलीय. ऐन उन्हातही भाविक मोठ्या संख्येन दर्शनासाठी रांग लावतायत. सुट्टी काऴात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं मंदीर परिसरात आणि दर्शन मार्गावर मंडप उभारलेयत. पिण्याच्या पाण्याचीही सोय दर्शन मार्गावर केलीय. समितीच्या योग्य नियोजनामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केलंय.
लाँग विकेंडमुळ पर्यटनस्थळ जशी गर्दी वाढलीय, तशीच गर्दी शिर्डी पंढरपूरमध्येही वाढलीय. पारा चढलेला असतानाही आपल्या विठुराय़ाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतायत. नाशिक अमरावती, नागपूर, मुंबईहून सहकुटुंब दर्शनाला मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेयत. दर्शनाला सुमारे चार ते पाच तास रांगेत उभं राहवं लागतंय. दर्शन मंडपानंतर रांग विणे गल्लीपर्यंत पोहचलीय.