साईंच्या दर्शनानं नववर्षारंभ करण्यासाठी शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी

देवदर्शनाबरोबरच नवीन वर्ष साजरा करण्यासाठी शिर्डीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीय. सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षात साईबाबांचं दर्शन भक्तांना घेता यावं यासाठी साईबाबा मंदिर आज रात्रभर खुलं असणार आहे. 

Updated: Dec 31, 2017, 10:19 AM IST
साईंच्या दर्शनानं नववर्षारंभ करण्यासाठी शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी title=

शिर्डी : देवदर्शनाबरोबरच नवीन वर्ष साजरा करण्यासाठी शिर्डीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीय. सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षात साईबाबांचं दर्शन भक्तांना घेता यावं यासाठी साईबाबा मंदिर आज रात्रभर खुलं असणार आहे. 

भक्तांच्या सुविधेसाठी अनेक उपाययोजना

भक्तांच्या सुविधेसाठी साईबाबा संस्थान आणि प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्यात. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या भक्त निवासातील खोल्या आणि हॉटेल्स भक्तांनी आधीच बुक केल्यात. त्यामुळे इतर भक्तांचे हाल होऊ नयेत म्हणून साई संस्थानच्या वतीने राहण्यासाठी ठिकठिकाणी तात्पुरते मंडप उभारण्यात आलेत. 

साई मंदिर रात्रभर खुले

तसेच भक्तांच्या दर्शनासाठी यंदाही मंदिर रात्रभर खुलं राहणार असून घाई न करता भक्तांनी दर्शन घ्यावं असं आवाहन साई संस्थानच्या वतीने करण्यात आलंय.