धनंजय मुंडे अशी पाहिली पवारांची मुलाखत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुलाखतकार म्हणून शरद पवार यांची सुरू असलेली मुलाखत विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल यात्रा सुरू असताना गाडीत बसून झी २४ तासच्या अॅपवर पाहिली. 

Updated: Feb 21, 2018, 07:31 PM IST
 धनंजय मुंडे अशी पाहिली पवारांची मुलाखत  title=

चाळीसगाव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुलाखतकार म्हणून शरद पवार यांची सुरू असलेली मुलाखत विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल यात्रा सुरू असताना गाडीत बसून झी २४ तासच्या अॅपवर पाहिली. 

या मुलाखतीची महाराष्ट्रात खूप उत्सुकता होती. तसेच राष्ट्रवादीचे नेत्यांमध्येही होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या मुलाखतीला हजेरी लावण्याऐवजी हल्लाबोल मोर्चात राहणारे पसंत केले. 

तसेच आदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी दिले आहे असल्याचे कळते. त्यामुळे गाडीत बसून झी २४ तासच्या अॅप Zeenews वर ही मुलाखत पाहत आहेत. 
धनंजय मुंडे यांनी याचा एक फोटो प्रसिद्ध केला आहे.