डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन

काही दिवसांपूर्वी शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंतपणे समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती. 

Updated: Sep 1, 2020, 08:51 PM IST
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन title=

लातूर: लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे मंगळवारी निधन झाले. ते १०४ वर्षांचे होते. अहमदपूर येथे आजच त्यांच्यावर शासकीय इतमामात विधीवत अंत्यसंस्कार केले जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृपया कोणीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी करू नये. फेसबुक पेजवरून त्यांचे अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार विधींचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. 

शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे 'हे' असणार नवीन उत्तराधिकारी

काही दिवसांपूर्वी शिवलिंग शिवाचार्य महाराज जिवंतपणे समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे अहमदपूरच्या भक्तीस्थळावर त्यांच्या अनुयायांनी एकच गर्दी केली होती. यावरून बरेच वाद निर्माण झाले होते. वीरशैव शिवा संघटनेचे प्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केला जात असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. 

महाराज शिवलिंग शिवाचार्य खरंच समाधी घेणार होते का?

या सगळ्या प्रकारानंतर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना उपचारासाठी नांदेडमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. सोमवारी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे स्वतः अविवाहित असल्यामुळे त्यांनी त्यांचे सख्खे भाऊ मन्मथ स्वामी यांच्या नातवांना उत्तराधिकारी जाहीर केले आहे.