धुळ्यात भारत बंदला हिंसक वळण, पोलीस जखमी, तोडफोड आणि जाळपोळ

शहरात भारत बंदला हिंसक वळण लागलं आहे, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. 

Updated: Jan 29, 2020, 04:19 PM IST
धुळ्यात भारत बंदला हिंसक वळण, पोलीस जखमी, तोडफोड आणि जाळपोळ title=

धुळे : शहरात भारत बंदला हिंसक वळण लागलं आहे, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. आंदोलकांशी झालेल्या झटापटीत २ पोलीस अधिकारी आणि १० पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. आंदोलकांनी दोन एसटीबसची देखील तोडफोड केली आहे. एवढंच नाही तर २ मोटारसायकलीही जाळल्या आहेत.

धुळे शहरात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात संवेदनशील वातावरणात वाढ झाली आहे. भारत बंदला एवढं हिंसक वळण मिळेल अशी शक्यता नव्हती, पण मोठ्या प्रमाणात आंदोलक हिंसक झाल्याचं आज दुपारी दिसून आलं.