तुमच्या गाडीला फास्टॅग लावलाय का? सावध व्हा, पाहा नवा 'झोल'

Digital tax collection: टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने फास्टॅग (FASTag) वाहनांसाठी बंधनकारक केला खरा... पण आता नवा प्रकार पुढे आला आहे.

Updated: Oct 20, 2021, 01:16 PM IST
तुमच्या गाडीला फास्टॅग लावलाय का? सावध व्हा, पाहा नवा 'झोल'

पुणे : Digital tax collection: टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने फास्टॅग (FASTag) वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आला. मात्र टोलच्या (Toll) झोलनंतर आता फास्टॅगमधील झोल उघड झाला आहे. पार्किंगमध्ये गाडी उभी तरी अकाऊंटमधून पैसे कट होत आहेत.

फास्टॅग रिचार्ज करूनही दुप्पट टोलवसुली होत आहे. याबाबत पुण्यातील व्यावसायिकांने तक्रार केली आहे. वर्षानुवर्षे टोलच्या व्यवहारात झोल सुरूच आहे. त्यात आता फास्टॅग आला तरी झोल संपलेले नाहीत. पुण्यात एका व्यावसायिकाला हा विचित्र अनुभव आला. गाडी पुण्यात घराखाली गॅरेजमध्ये उभी होती. आणि अचानक मोबाईलवर मेसेज आला. फास्टॅगमधून पैसे कापले गेल्याचा तो मेसेज होता. विशेष म्हणजे मेसेजमध्ये उल्लेख केलेला टोलनाका अहमदनगर जिल्ह्यातला आहे. 

या प्रकारानंतर त्यांनी लगेच तक्रार दाखल केली. इतकेच नाही तर, फास्टॅग अकाऊंट अ‍ॅक्टीव्ह असताना किंवा रिचार्ज केल्यानंतरही फास्टॅग बंद असल्याचे दाखवून दुप्पट टोल वसूल केला जात आहे. अनेकदा याबाबत तक्रार करूनही काहीच उपयोग होत नसल्याचे वाहनचालक आणि नागरिकांचे म्हणणे आहे.