नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा

भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात सध्या राजकीय वातावरण जोरदार तापल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये अंतर्गत वाद पुढे आल्याचे दिसून येत आहे. 

Updated: Dec 8, 2020, 08:50 AM IST
नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा  title=

नागपूर : भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात सध्या राजकीय वातावरण जोरदार तापल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये अंतर्गत वाद पुढे आल्याचे दिसून येत आहे. भाजपचे नेते आणि महापौर (Nagpur Mayor ) संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी पदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह असल्याचे दिसून येत आहे.

विधानपरिषद पदवीधर निवडणुकीत संदीप जोशी यांचा पराभव झाला. या मतदारसंघ गेली कित्येक वर्ष भाजपच्याच ताब्यात होता. मात्र, यावेळी काँग्रेसने महाआघाडीच्या माध्यमातून बाजी मारली आणि भाजपलाच त्यांच्याच बालेकिल्ल्यात शह दिला. त्यामुळे संदीप जोशी नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर ते शहराबाहेर आहे. त्यांचा पदभार उपमहापौर मनिषा कोठे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे संदीप जोशी यांच्या महापौरपदाच्या राजीनाम्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. 

भाजप शहराध्यक्षांनी मात्र जोशी यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. दरम्यान पुढील महिन्यात संदीप जोशी यांचा पक्षाने निश्चित केलेला महापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे महापौर संदीप जोशी बाहेरगावी गेल्याचे म्हटले जात आहे. मात्र, विधानपरिषद पदवीधर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते शहराबाहेर गेल्याने चर्चेने अधिक जोर धरला आहे.