धक्कादायक! पार्किंगमध्ये गाडी लावण्याचा क्षुल्लक वाद एकाच्या जीवावर बेतला

 Mahad MIDC Murder :  : पार्किंगसाठी गाडी लावण्याच्या कारणावरुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की भाजी कापण्याचा सुरीने मानेवर वार करुन ड्रायव्हरचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.  

Updated: May 5, 2022, 03:56 PM IST
धक्कादायक! पार्किंगमध्ये गाडी लावण्याचा क्षुल्लक वाद एकाच्या जीवावर बेतला title=

रायगड :  Raigad Mahad MIDC Murder : पार्किंगसाठी गाडी लावण्याच्या कारणावरुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की भाजी कापण्याचा सुरीने मानेवर वार करुन ड्रायव्हरचा खून केल्याची धक्कादायक घटना महाड येथे मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.  

महाड एमआयडीसीत गाडी लावण्याच्या वादातून एका ड्रायव्हरचा खून झाला. बुधवारी रात्रीच्या सुमारास इंडिया डिटर्जंट कंपनीसमोर हा प्रकार घडला. गाडी उभी करण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गट एकमेकांना भिडले.

त्यातील एकाने भाजी कापण्याच्या सुरीने एका ड्रायव्हरच्या मानेवर सपासप वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटना स्थळापासून थोड्याच अंतरावर छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.