close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ठाणे मनपा आयुक्त आणि महापौरांचा वाद अखेर 'मातोश्री'वर मिटला

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटल्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

Updated: Sep 10, 2019, 04:48 PM IST
ठाणे मनपा आयुक्त आणि महापौरांचा वाद अखेर 'मातोश्री'वर मिटला

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटल्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

आयुक्त आणि महापौर यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी मंगळवारी सकाळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांनाही मातोश्रीवर बोलवून घेतले. हा वाद मिटवण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. आता तिढा सुटला असून, आमच्यातील रूसवे मिटले आहेत, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी वाद मिटल्याचं जाहीर केलं.