close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

दंडाच्या रकमेबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार करावा- रावते

नव्या मोटरवहन कायद्याला तुर्तास स्थगिती मिळाली आहे.

Updated: Sep 11, 2019, 07:10 PM IST
दंडाच्या रकमेबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार करावा- रावते

मुंबई : नव्या मोटरवहन कायद्याला माझा विरोध नाही पण मोठ्या दंडाविरोधात जनतेचा रोष असून त्याचा अनादर केलेला नसल्याचे राज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात नितीन गडकरी यांना आज पञ पाठवलंय. लोकांचा असंतोष तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. दंडाच्या रकमेबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार करावा असेही त्यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे नव्या मोटरवहन कायद्याला तुर्तास स्थगिती मिळाली आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभू्मीवर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना तुर्तास तरी नव्या मोटरवहन कायद्यानुसार दंड भरावा लागणार नाही. 

गुजरातने घोषणा केलीय पण प्रत्यक्षात आदेश काढले नाहीत. नव्या मोटर वेहीकल कायद्याबाबतीत राज्य तटस्थ असल्याचे ते म्हणाले. जनतेचा इतका रोष असताना कायदा कसा अंमलात आणायचा हे केंद्रानेच सांगावे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कायदा लागू झाला तेव्हा निवडणुकीचा विषय होता का? त्यामुळे आमच्या भूमिकेचा निवडणुकीशी संबंध लावू नये असेही रावतेंनी यावेळी स्पष्ट केले.