Diwali Holiday: दिवाळीत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मजा! नोव्हेंबरमध्ये 'इतके' दिवस शाळांना सुट्ट्या

Diwali Holidays 2024: विविध राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक सुट्ट्या आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Oct 28, 2024, 02:28 PM IST
Diwali Holiday: दिवाळीत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मजा! नोव्हेंबरमध्ये 'इतके' दिवस शाळांना सुट्ट्या title=
दिवाळी सुट्टी

Diwali Holidays 2024: महत्वाचा प्रमुख सण दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळी हा भारतातील सर्वात प्रमुख सणांपैकी एक आहे. देशातील विविध राज्यांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशासह देशाबाहेरील भारतीयदेखील दिवाळी मोठ्या धामधुमीत साजरा करतात. याला दिव्यांचा सण म्हटलं जातं. दिवाळीच्या या खास क्षणी शाळा-कालेज आणि इतर शिक्षण संस्था तसेच ऑफिसला सुट्टी असते. यूपी, बिहार, दिल्लीसहित काही राज्यांमध्ये 4 ते 5 दिवस सुट्टी आहे. भारतातील काही राज्यांमध्ये केवळ एकच दिवस सुट्टी आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जास्त दिवस सुट्टी आहे. याबद्दल जाणून घेऊया.  

31 ऑक्टोबर 2024 म्हणजेच गुरुवारपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. असे असले तरी काही लोक 1 नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी हा सण साजरा करतात. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये शाळांना सुट्टी असते. 

केरळ आणि हिमाचल प्रदेश

दिवाळी हा सण प्रामुख्याने उत्तर भारतात साजरा केला जातो. पण दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये दिवाळी फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. केरळ, यूपी, एमपी, बिहार, दिल्ली या राज्यांप्रमाणे दिवाळी कमी प्रमाणात साजरी केली जाते. त्यामुळे केरळसह या राज्यांमध्ये दिवाळीची सुट्टी फक्त एक दिवसाची असेल. ही सुट्टी 1 नोव्हेंबरला मिळेल. हिमाचल प्रदेशात दिवाळीला विशेष सुट्टी नसते.

उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत शाळा, कॉलेजला सुट्टी असेल. दिवाळीच्या तारखेत बदल झाल्यामुळे ही सुट्टीही बदलली जाऊ शकते. आतापर्यंतच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार उत्तराखंडमध्ये दिवाळीला विशेष सुट्टी देण्यात आलेली नाही. येथील शाळांमध्ये दिवाळीसाठी केवळ १ नोव्हेंबर रोजी एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील शाळांना दुसरा आणि तिसरा शनिवार-रविवारी सुट्टी असेल.  

जम्मू आणि काश्मीर

जम्मू-काश्मीरसारख्या डोंगराळ भागातही दिवाळीची सुट्टी नसते. येथील रहिवासी त्यांच्या स्थानिक परंपरा आणि सणांना प्राधान्य देतात. काही लोक इथेही दिवाळी साजरी करतात पण त्यांच्यात इतर राज्यांसारखा उत्साह दिसून येत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये दिवाळीला सरकारी सुट्टी नसते. विद्यार्थ्यांना दिवाळीऐवजी तिथल्या इतर स्थानिक सणांना सुट्टी मिळते.

मेघालय आणि अरुणाचल प्रदेश

मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसामसह ईशान्येकडील बहुतांश राज्यांमध्ये दिवाळीपेक्षा इतर सणांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना दिवाळीत जास्त सुट्ट्या नसतात. मेघालयातील उंच पर्वतीय भागातील स्थानिक आदिवासी संस्कृतींची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे या राज्यामध्ये दिवाळीला सुट्टी देण्याची तरतूद नाही. या राज्यांतील बहुतांश शाळा त्यांच्या पारंपरिक सणांच्या निमित्ताने बंद राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळत नाही.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक सुट्ट्या 

महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. शिक्षकांना सुट्ट्याच्या काळात निवडणूक प्रशिक्षणाचे काम असते.इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील शालेय आणि काँलेजच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक सुट्ट्या आहेत. यंदा महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना एकूण 14 दिवस सुट्ट्या असतील. राज्यातीन अनेक शाळा 12 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. काही प्राथमिक शाळा 16 नोव्हेंबरला सुरु होतील.