अमरावती : ४ नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी डॉ.पंजाबराव देशमुख रुग्णालयातीलडॉ. भूषण कट्टा यांना अटक करण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयाचे डीन डॉ. दिलीप जाणे, डॉ. पंकज बारब्धे आणि डॉ. प्रतिभा काळे यांना सहआरोपी करण्यात येणार आहे.
या चारही नवजात मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी ४ नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. ही घटना रविवारी 28 मे रोजी घडली.
डॉ. भूषण कट्टा हे बालकांच्या मृत्यू वेळी तिथेच ड्युटीवर होते आणि मुलांच्या मृत्यूला त्यांचा हलगर्जीपणाच जबाबदार आहे, असा आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केला होता.