शिक्षण आणि श्रीमंतीमुळे उद्धटपणा येतो आणि घटस्फोट होतात- भागवत

शिक्षण आणि श्रीमंतीमुळे उद्धटपणा येतो आणि त्यामुळे घटस्फोट होतात असं अजब तर्कट 

Updated: Feb 17, 2020, 07:58 AM IST
शिक्षण आणि श्रीमंतीमुळे उद्धटपणा येतो आणि घटस्फोट होतात- भागवत  title=

मुंबई : शिक्षण आणि श्रीमंतीमुळे उद्धटपणा येतो आणि त्यामुळे घटस्फोट होतात असं अजब तर्कट सरसंघचालक मोहन भागवतांनी मांडलंय. घटस्फोटांचं प्रमाण हे सुशिक्षित आणि श्रीमंत कुटुंबात अधिक आहे असं भागवत म्हणालेत. हिंदू समाज व्यवस्थेला पर्याय नाही असा दावा त्यांनी केला. मात्र त्याचवेळी महिला सबलीकरणावर भर देताना महिलांना घरात डांबून ठेवण्याला त्यांनी कडाडून विरोध केला. 

महिलांना घराबाहेर पडू न दिल्यामुळे समाजाची दूरवस्था झाली असल्याचा दावा त्यांनी केलाय. २००० वर्षांपूर्वी ही स्थिती नव्हती. महिलांना स्वातंत्र्य होतं. तो आपल्या समाजव्यवस्थेचा सुवर्णकाळ होता असंही भागवत म्हणाले.

स्वयंसेवकांनी आपण बाहेर काय काम करतो ते घरात महिलांना आवर्जून सांगा कारण कुटुंब घडवण्यासाठी महिला अधिक त्रास सहन करतात असं भागवत यांनी नमूद केलं.