Crime News: valentine week सुरु असताना घडली भयानक घडना; प्रेम मिळवण्यासाठी आईलाच...

 valentine week ची धुम सुरु असतानाच नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमासाठी एका मुलाने आईला मारहाण केली आहे (Nashik Crime News). 

Updated: Feb 7, 2023, 06:40 PM IST
Crime News:  valentine week सुरु असताना घडली भयानक घडना; प्रेम मिळवण्यासाठी आईलाच...

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : 7 फ्रेबुवारीपासून व्हॅलेन्टाईन वीक (valentine week 2023) सुरु झाला आहे. Valentine week सुरु असतानाच नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम मिळवण्यासाठी एका मुलाने आपल्या आईवर दबाव आणत तिला मारहाण करत संपूर्ण घर पेटवून दिले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रेमासाठी आईला मारहाण करणाऱ्या या माथेफिरु प्रेमवीराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे (Nashik Crime News).  

आई तू माझ्या प्रेमात अडथळा झाली आहे. असे म्हणत मुलाने आईला जबर मारहाण केली आहे.  मुलगा प्रेम करत असलेल्या मुलीसोबत लग्न लावून देण्यास आईने विरोध केला. यामुळेच या मुलाने आईला  मारहाण केली आणि घरही पेटवले.  मालमत्ता, पैसे, दागिन्यासाठी सखा भाऊ, वडील, आई, बहिण यांची हत्या किंवा मारहाण केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र, प्रेमात अडथळा येत असल्याने पोटच्या जन्मदात्या आईला मारहाण करू घर जाळून टाकल्याची घटना उघकीस आली आहे. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण 

बेबी विठ्ठल पवार असे मुलाकडून मारहाण झालेल्या आईचे नाव आगे. बेबी पवार या मुलगा अंकुश सोबत नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील आराई ठेंगोडे या गावात राहतात. अंकुशला दारू पिण्याचे व्यसन आहे. 
4 फेब्रुवारी रोजी अंकूश रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत घरी आला. आईने स्वयंपाक करून ठेवला असल्याने त्याने स्वत: जेवण वाढून घेतले. आईचे जेवण बाकी असल्याने त्याने आईला जेवणासाठी बोलावले. यावर आईने, “तू दारु पिऊन आल्याने मी जेवण करणार नाही” असे उत्तर दिले. याचा राग अंकुशला आला. 

या कारणासाठी आईला केली मारहाण 

अंकुशच एका मुलीवर प्रेम आहे. या मुलीसोबत अंकुशला लग्न करायचे होते. मात्र अंकुशच्या आईने या लग्नाला विरोध केला होता. मुलीला दोन मुल आहेत आणि ती इतर समाजाची असल्याने आईने या लग्नाला नकार दिला होता. याचा राग अंकुशच्या मनात होता. 

शनिवारी नशेत असताना अंकूशचे आईसोबत भांडण झाले. तू माझ्यात प्रेमात अडथळा झाली आहेस. एक दिवस तुझा काटाच काढतो. अशी दमदाटी करुन अंकुशने आईला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यानंतर सिलेंडरची नळी मोकळी करत घरातील दिवा लावून घराला आग लावली. 

आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल 

संतापात अंकुशने घराला आग लावल्याने घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आईच्या फिर्यादीवरून सटाणा पोलीस ठाण्यात अंकुश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.