मुंबई : Eknath Shinde government cabinet expansion : राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मंत्र्यांच्या नावांची यादीही निश्चित झाली आहेत. आज 18 आमदार शपथ घेणार आहेत. शिंदे - फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा राजभवनात सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा होत आहे.
तब्बल महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर आज अखेर मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. आज सकाळी वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये आज 18 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. भाजपचे 9 मंत्री तर शिंदे गटाचे 9 मंत्री आज शपथ घेतील. राजभवनात छोटेखानी समारंभात हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या लिस्टमध्ये एकही महिला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजपकडून आज शपथ घेणाऱ्यांची नावं जवळपास निश्चित झाली असली तरी शिंदे गटाकडून नेमके कोण कोण शपथ घेणार, याचा अंतिम निर्णय झालेला नव्हता. मात्र, उदय सामंत यांनी शिंदे गटाकडून नऊ जण आणि भाजपकडून नऊ, असे 18 जण मंत्रीपदाची शपथ घेतील, असे सांगितले. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर शिंदे समर्थक 50 आमदार उपस्थित राहणार आहे. या बैठकीत नावं अंतिम केली जाणार आहेत.
शिंदे गटाकडून 9 मंत्री मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अब्दुल सत्तार यांचाही मंत्रिमंडळात समावेश असेल तर संजय राठोड, केसरकरही मंत्रिमंडळात असतील की नाही याचा अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, शिंदे गटाच्या बैठकीनंतर नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे.
शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संदीपान भुमरे, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत,संजय राठोड आणि दीपक केसरकर या नऊ जणांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपकडून मंत्रिपदासाठी 9 जणांची नावं निश्चित झाली आहेत. यात मुंबईतून आमदार मंगलप्रभात लोढांना संधी आहे. सुधीर मुनगंटीवार, अतुल सावेंना संधी आहे. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील , गिरीश महाजन , सुरेश खाडे रवींद्र चव्हाण , अतुल सावे , मंगलप्रभात लोढा, विजयकुमार गावित यांच्या समावेश आहे. मुंबईतून आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर हे मुख्य चेहरे बाजूला ठेवत मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आलीय. तर दलित कोट्यातून सुरेश खाडे तर आदिवासी कोट्यातून विजयकुमार गावित यांना संधी मिळणार आहे.