मोठी बातमी । बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे मुंबईत परतणार

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.  गुवाहाटीत अनेक दिवस ठाण मांडून बसलेले बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे उद्या मुंबईत परतणार आहेत. 

Updated: Jun 29, 2022, 09:48 AM IST
मोठी बातमी । बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे मुंबईत परतणार title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर बंडखोर आमदार महाराष्ट्रात कधी परतणार याची प्रतीक्षा होती. याबाबत एकनाथ शिंदे यांनी स्वत: माहिती दिली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. दरम्यान, गुवाहाटीत अनेक दिवस ठाण मांडून बसलेले बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे उद्या मुंबईत परतणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी 'झी 24 तास'ला EXCLUSIVE माहिती दिली. एकनाथ शिंदे उद्या मुंबईत पोहोचणार असल्याचे त्यांनीच सांगितले. गुवाहाटीताल कामाख्या देवीच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदे आज गेले होते, तेथे त्यांनी ही माहिती दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बहुमत सिद्ध करण्याच्या आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला दिल्यानंतर शिंदे गटाच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष होते. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, सर्व आमदारांना घेऊन आम्ही बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईमध्ये पोहोचणार आहोत. सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण करु.

 दरम्यान, राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला (Floor Test) सामोरे जाणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहे. बहुमत चाचणी सांगितल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयात तयारी करत होती. आता परिस्थिती जैसे थे ठेवली जात नसल्याविरोधात महाविकास आघाडी सरकार याचिका दाखल करण्यासाठी तयारी करत आहे. बहुमत चाचणीविरोधात शिवसेना न्यायालयात दाद मागणार आहे.  

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी 48 तास दिले आहेत. त्यानुसार उद्याच विशेष अधिवेशन घेऊन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आलेत. राज्यपालांनी तसे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. त्यामुळे उद्या ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा आहे. उद्याच ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावं लागेल. सदस्यांना आपापल्या जागेवर उभं करूनच त्यांची शिरगणती केली जाईल. राज्यपालांच्या आदेशांनंतर आता ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे.