मुंबईकरांना घडणार व्हीक्टोरिया राईडची सफर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता लवकरच या व्हीक्टोरिया राईडची सफर करता येणार आहे.

Updated: Mar 14, 2021, 04:13 PM IST
मुंबईकरांना घडणार व्हीक्टोरिया राईडची सफर  title=

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता लवकरच या व्हीक्टोरिया राईडची सफर करता येणार आहे.

जुन्या काळात अशाप्रकारे राणीसाठी दळणवळणाची साधनं असत. त्याची अनुभुती आता मुंबईकरांनाही घेता येणार आहे. त्यावेळी या गाड्यांना घोडे असायचे मात्र आता ही राईड पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल.

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाईन्स, काला घोडा, फ्लोरा फाऊंटेन, नरीमन पॉईंट, गिरगाव चौपाटीसारख्या ठिकाणी ही राईड सुरू करण्यात येणार आहे. नुकतंच या राईडची चाचणीही घेण्यात आली आहे.

या राईडची किंमत १०० रूपयांच्या घरात असण्याची माहिती मिळतेय. शिवाय विकेंडला ही इलेक्ट्रीक व्हीक्टोरिया बग्गी हेरिटेज टूरही घडवणार आहे. ज्याची किंमत ५००रूपयांच्या दरम्यान असेल.

या एकूण १२ बग्गी आहेत. २० किलोमीटर प्रति तास असा या गाड्यांचा वेग असेल. मुंबईतल्या गर्दीच्या ठिकाणी या बग्गी चालवता येणार नाहीत. मात्र या गाड्यांचे मार्ग आणखी वाढवता येतील का याबाबत सुद्धा विचारविनिमय सुरू आहे.

उबो राईड्ज ही कंपनी या राईड सुरू करणार आहे. राज्य सरकारच्या परिवहन विभागाने याला परवानगी दिली आहे.