Elon Musk Dream Job: प्रत्येकाच्या मनात ड्रीम जॉब ही संकल्पना असते. मस्तपैकी आरामात घरी बसून काम करावं, तासाचे हजारो रुपये मिळावे, अशी प्रत्येकाची कल्पना वेगळी असू शकते. तुम्हीदेखील असा काही ड्रीम जॉब शोधत असाल तर तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एलोन मस्कच्या AI कंपनी नोकरीमध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. एआय कंपनीत xAI मध्ये AI ट्यूटरची भरती केली जाणार आहे. या नोकरीत तुम्हाला खूप चांगले पैसे मिळतील. कोणं देतंय अशी नोकरी? किती मिळेल पगार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
AI ट्यूटर भरती अंतर्गत तुम्हाला प्रत्येक एका तासासाठी 5,000 रुपये मिळू शकतात. हे काम थोडे तांत्रिक वाटेल पण ते सरावाने तुम्हाला ते सहज समजू शकते. AI ट्यूटर म्हणून तुम्हाला xAI ची आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम योग्य पद्धतीने शिकण्यास मदत होणार आहे. तुम्हाला त्यांना डेटा आणि फीडबॅक पाठवायचा आहे. तुमच्या कामामुळे AI अधिक स्मार्ट बनणार आहे. तुम्ही लिंक्डइनच्या माध्यमातून या नोकरीसाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला एलॉन मस्कच्या कंपनीत नोकरीची संधी मिळणार आहे.
एआयने हळुहळू जगभरात शिरकाव केलाय. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एआय टूल दिसू लागले आहे. जगाला समजेल अशी AI तयार करणे हे xAI चे ध्येय आहे. AI ट्यूटर म्हणून तुमच्यावर हीच जबाबदारी आहे. AI ला फ्रेश आणि लेबल केलेला डेटा द्यायचा आहे. ज्यातून AI शिकू शकेल. तुम्ही दिलेल्या या डेटामुळे एआय सिस्टमला भाषा चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होणार आहे.
आजकाल लोक चॅटबॉट्स आणि एआयचा उपयोग करुन लेख लिहितात किंवा लेखी माहिती वापरतात. दिवसेंदिवस हे युजर्स वाढणार आहेत. तत्पुर्वी एआय ट्यूटरला मोठ्या प्रमाणात डेटा संकलित करावा लागेल आणि यासाठी त्यांना मोठ्या तांत्रिक टीमचीदेखील गरज आहे. एआय ट्यूटरने देखील डेटा चांगल्या दर्जाचा असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. xAI च्या सॉफ्टवेअरचा वापर करून माहितीचे लेबल किंवा वर्गीकरण करणे हे AI ट्युटर्सचे काम असेल. तुम्हाला AI ला काही डेटाचा अर्थ सांगावा लागेल. AI शिकण्यासाठी तुम्हाला नवीन कामदेखील तयार करावे लागेल. तुम्हाला असाइनमेंट्स देखील लिहावे लागतील. ज्यामुळे AI भाषा समजणे किंवा मजकूर तयार करणे चांगले होणार आहे.
इंग्रजी चांगले लिहू आणि वाचू शकतील, अशा उमेदवारांना या नोकरीच प्राधान्य दिले जाणार आहे. तुम्हाला तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसली तरी चालेल पण तुम्ही लेखन किंवा पत्रकारितेचे काम यापूर्वी केले असेल किंवा तुमच्याकडे संशोधन कौशल्य चांगले असेल तर तुमची नोकरी कन्फर्म होण्यास मदत होईल. तुम्हाला विविध सोर्सकडून माहिती काढण्यात हुशार असणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला भरपूर कंटेंटचे संशोधन आणि लेबलिंग करावे लागणार आहे.
हे काम रिमोट वर्क आहे. यामध्ये सुरुवातीचे दोन आठवडे तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर तुम्ही घरून काम करू शकता. तुम्हाला सकाळी 9 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत काम करावे लागेल. एकदा का प्रशिक्षण मिळाले की तुम्ही तुमच्या टाइम झोननुसार काम करू शकता. तुम्हाला खूप चांगले पैसे मिळतील. तुम्हाला प्रत्येक तासासाठी 35 ते 65 डॉलर मिळू शकतात.भारतीय रुपयानुसार हे प्रति तास अंदाजे 5,000 रुपये होतात. याशिवाय, xAI तुम्हाला वैद्यकीय, दंत आणि दृष्टी विमा देखील मिळेल. जर तुम्हाला तंत्रज्ञानाची आवड असेल तर डेटा कसा लिहायचा आणि व्यवस्थित कसा मांडायचा हे माहित असेल. त्यामुळे ही नोकरी तुमच्यासाठी खूप चांगली असू शकते. तुम्ही या नोकरीद्वारे AI चे भविष्य घडवण्यात मदत करू शकता.