इंजिनिअरींग शिक्षणाचा बाजार उठला, ३१ कॉलेज बंद

राज्यात ३१ संस्थांकडून इंजिनिअरींग कॉलेजेस बंद करण्यासाठी अर्ज, इंजिनिअरींग आणि कॉम्प्युटर संबंधातले ४०० कोर्सेस गेल्या दोन वर्षात बंद, इंजिनिअरींग शिक्षणाच्या बाजारीकरणाला चाप लागण्याची शक्यता.

Updated: Jun 21, 2017, 10:04 PM IST
इंजिनिअरींग शिक्षणाचा बाजार उठला, ३१ कॉलेज बंद title=

योगेश खरे, नाशिक : राज्यात ३१ संस्थांकडून इंजिनिअरींग कॉलेजेस बंद करण्यासाठी अर्ज, इंजिनिअरींग आणि कॉम्प्युटर संबंधातले ४०० कोर्सेस गेल्या दोन वर्षात बंद, इंजिनिअरींग शिक्षणाच्या बाजारीकरणाला चाप लागण्याची शक्यता.

राज्यात इंजिनिअरींग आणि कॉम्प्युटर शिक्षणाचा फिवर उतरताना दिसतोय. गेल्या २ वर्षात ३१ महाविद्यालयांनी स्वतःहून आपलं कॉलेज बंद करण्यासाठी अर्ज केलेत. सुमार चारशे कोर्सेस आत्तापर्यंत बंद करण्यात आलेल्याने विद्यार्थ्यांचा कल या क्षेत्राकडे कमी होताना दिसतोय. 

२०१७- १८  म्हणजेच यावर्षी राज्यातल्या ६ महाविद्यालयांनी स्वतःहून आपली प्रवेश प्रक्रिया थांबवली. या संस्थांनी ही कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर यावर्षी राज्यातून महाविद्यालयात सुरू असलेले ११० कोर्सेसही बंद झालेत. यात कॉम्प्युटरसह आयटी, मेकॅनिकल, सिव्हीलसारखे अनेक कोर्सेस आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक कोर्सेस शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्यात बंद झालेत. 

विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक महाविद्यालयं सुरू झाल्याने विद्यार्थी संख्या कमी आणि वर्ग जास्त झाले. गेल्या चार वर्षांपासून याचा फटका बसू लागला. गेल्या ४ वर्षात ६० महाविद्यालयं बंद झाली. तर ३०० हून अधिक कोर्सेस राज्यात बंद झाले. व्यवस्थापनाची मनमानी, अवाजवी शुल्क आणि दर्जा नसलेलं शिक्षण या कारणांमुळे अनेक संस्था डबघाईला आल्या. 

जीएसटीमुळे अनेक विद्यार्थी कॉमर्सकडे वळल्याचं सध्या चित्र आहे. तसंच योगासह लाईफ स्टाईल कोर्सेसचीही मागणी वाढलीय. भविष्यात इंजिनिअरींगच्या शिक्षणाच्या बाजाराला चाप लागणार आहे.