माजी लष्करी अधिकाऱ्याची खासगी बंदुकीने आत्महत्या

रवींद्र सोनवणे असं माजी सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं नाव आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 5, 2018, 12:45 PM IST
माजी लष्करी अधिकाऱ्याची खासगी बंदुकीने आत्महत्या title=

नाशिक : सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यानं स्वतःच्या खासगी बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  मालेगावच्या सोयगाव परिसरात घडली. रवींद्र सोनवणे असं माजी सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं नाव आहे. 

आघार बुद्रुकमधील ते मुळचे रहिवासी

मालेगाव तालुक्यातील आघार बुद्रुकमधील ते मुळचे रहिवासी होते. 2013 मध्ये सैन्यामधून सेवानिवृत्त झाल्यानंतर सोयगाव परिसरातील माउली पार्कमध्ये ते पत्नी, मुलगा आणि मुलीसह राहत होते. पत्नी स्वयंपाक करत असताना त्यांनी आपल्याकडील बारा बोअरच्या बंदुकीतून तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली. 

आत्महत्येनं एकच खळबळ

रवींद्र सोनवणे यांच्या आत्महत्येनं एकच खळबळ उडालीय. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. दरम्यान, आजारपणामुळे ते नैराश्यात होते. आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.