Maharashtra Exit Poll Results 2024: महायुतीचं 45+ चं स्वप्न अपूर्ण राहणार? मविआत ठाकरे गट मोठा भाऊ; एक्झिट पोलने स्पष्ट केलं चित्र

Maharashtra Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. महाराष्ट्रातील 48 जागांवर नेमकं काय चित्र असेल हे यातून स्पष्ट झालं आहे.    

शिवराज यादव | Updated: Jun 1, 2024, 08:48 PM IST
Maharashtra Exit Poll Results 2024: महायुतीचं 45+ चं स्वप्न अपूर्ण राहणार? मविआत ठाकरे गट मोठा भाऊ; एक्झिट पोलने स्पष्ट केलं चित्र   title=

Maharashtra Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांना प्रतिक्षा लागलेली असताना एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. एकीकडे देशात कोणाची सत्ता येणार याची सर्वांना उत्सुकता असताना महाराष्ट्राकडेही सर्वांचं लक्ष आहे. महाराष्ट्रातील राजकीय गुंतागुंत पाहता मतदार कोणाच्या बाजूने पारडं झुकवणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या 48 जागांचा समावेश असून मतदार महायुतीला कौल देणार की महाविकास आघाडीला हे पाहावं लागणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर होणारी ही पहिली मोठी निवडणूक असल्याने महाराष्ट्राची जनता काय कौल देते हे औत्सुक्याचं आहे. दरम्यान एक्झिट पोलचे निकाल काय सांगतायत हे जाणून घ्या. 

रिपब्लिक-मॅट्रीज

रिपब्लिक-मॅट्रीज एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात एनडीएला 30 ते 36 जागा मिळू शकतात. तसंच इंडिया आघाडी म्हणजे महाविकास आघाडीला 13 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना एकही जागा मिळणार नाही. 

टीव्ही 9 -पोलस्ट्रॅट

टीव्ही 9 -पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी 23 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे. तर इतरांना 1 जागा मिळेल. 

भाजपाला 18, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. तर मविआत काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14, पवार गटाला  6 जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे. 

एबीपी-सी वोटर

एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 24 जागा मिळतील. यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 6, भाजपाला 17, अजित पवारांना 1 जागा असेल. तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना 9, शरद पवारांना 6 आणि काँग्रेसला 8 अशा 23 जागा मिळतील. 1 जागा इतरांना मिळेल 

न्यूज 18 - मेगा एक्झिट

न्यूज 18 - मेगा एक्झिट पोलनुसार महायुतीला 32 ते 35 आणि महाविकास आघाडीला 15 ते  18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये भाजपाला 23, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 2 जगा मिळतील. दरम्यान महाविकास आघाडीत काँग्रेसला 5, उद्धव ठाकरे गटाला 7 आणि शरद पवार गटाला 4 जागा मिळतील. 
 

टाइम्स नाऊ-ईटीजी आणि रिपब्लिक

टाइम्स नाऊ-ईटीजीनुसार महायुतीला 26 आणि महाविकास आघाडीला 22 जागा मिळतील. तर रिपब्लिकनुसार महायुती 32 तर महाविकास आघाडी 16 जागांवर विजयी होईल. 

(Desclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल आणला आहे. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवणार आहोत. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी 'झी 24 तास' जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.)