Crime News: वर्ध्यात बनावट दारू निर्मितीचे रॅकेट उघड, 5 तासांत दोन मोठ्या कारवाया!

Wardha Crime News: पोलिसांनी पोद्दार बगीचा येथे केलेल्या कारवाईत घरातच चक्क बारप्रमाणे सेटअप लावल्याच आढळून आलं होतं. घरात विहिरीसारखी 20 फुट लांबीची सुरंगही आढळून आली.

Updated: Jan 28, 2023, 10:56 PM IST
Crime News: वर्ध्यात बनावट दारू निर्मितीचे रॅकेट उघड, 5 तासांत दोन मोठ्या कारवाया!
Wardha Crime News

Wardha News:  पोलीसांनी केलेल्या कारवाईत (Wardha Police) वर्ध्यात बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्याची पोलखोल करण्यात आली आहे. मोठे रॅकेट या कारवाईत समोर येण्याची शक्यता निर्माण झाली असून सावंगी येथे चिंतामणी अपार्टमेंटमध्ये बनावट दारूच्या शेकडो बॉटलसह, बनावट दारू बनविण्याचे विषारी रसायन, बनावट सील आणि रिकाम्या बॉटलही आढळून आल्या आहे. (Fake liquor manufacturing racket exposed in Wardha two big operations in 5 hours Marathi Crime News)

वर्ध्यातील (Wardha Crime News) सावंगीच्या एका अपार्टमेंट हा बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरू होता. वर्ध्यातील पोलिसांची शनिवारची ही दुसरी मोठी कारवाई आहे. सकाळच्या सत्रात पोलिसांनी रामनगर येथील पोद्दार बगीच्या परिसरात पहिली कारवाई केली होती. कारवाईत दारू विक्रेत्याच्या घरात  दारू लपवून ठेवण्यासाठीचे भुयार सापडले होते. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने (Crime Intelligence Unit) कारवाई केली आहे.

वर्धा जिल्ह्यात दारूबंदी (Alcohol banned) असली तरी दारुविक्रेते नवनव्या क्लुप्त्या दारू लपवण्यासाठी वापरतात. पोलिसांनी पोद्दार बगीचा येथे केलेल्या कारवाईत घरातच चक्क बारप्रमाणे सेटअप लावल्याच आढळून आलं होतं. घरात विहिरीसारखी 20 फुट लांबीची सुरंगही आढळून आली आहे. ही सुरुंग दारू लपवून ठेवण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

आणखी वाचा - Shocking : ऑक्सिजन सिलेंडर डोक्यात पडला आणि... हॉस्पीटल बाहेरच नऊ वर्षाच्या मुलाचा भयानक मृत्यू

वर्ध्यातील पोद्दार बगिचा परिसरात पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकानं (Crime Intelligence Squad) छापा घातला. यावेळी सराईत दारू विक्रेत्याच्या घराची तपासणी केली असता तीन ते चार खोल्यांमध्ये बारप्रमाणे सेट अप आढळला.  घरात सुरुंगाप्रमाणे विहीर आढळली.  या कारवाईत पोलिसांनी एक लाख रुपयांवर मुद्देमाल जप्त केला. 

दरम्यान, वर्ध्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन (Nurul Hasan) यांच्या पथकाने दुपारी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सावंगी स्थित चिंतामणी अपार्टमेंट गाठले, तेथे देखील एका बंद खोलीत रिकाम्या बॉटल मध्ये बनावट दारू बनविली जात असल्याचे समोर आले आहे. तेथे शेकडो दारूच्या बॉटल सापडल्या आहे. सोबतच बनावट दारू बनविण्यासाठी आवश्यक असणारे रसायन आणि बनावट सील देखील आढळून आले. पोलिसांनी सर्व साधने जप्त केली आहे.