नागपूर : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालकांसह एका क्रीडा अधिकाऱ्याला नागपुरात मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
बोगस खेळांडूंवर कारवाईनंतर बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी क्रीडा अधिका-यांवर ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळं झी 24 तास पाठपुराव्याला मोठ यश मिळालं आहे.--बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी लाटणाऱ्या दोघा खेळाडूंना अगोदरच अटक करण्यात आली होती.
बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणाचा तपास करताना तत्कालीन क्रीडा उपसंचालक आणि क्रीडा अधिकारी यांनी क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी न करता पदाचा दुरुपयोग केल्याचं आढळलं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.
नागपुरात अगोदरच 22 बोगस खेळाडूंचे बनावट क्रीडा प्नमाणपत्र रद्द करण्यात आलेय. याप्रकरणी मोठं रॅकेट असून अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. राज्यातील संपूर्ण क्रीडा विश्वात याप्रकरणामुळं खळबळ उडाली आहे.