उत्तर महाराष्ट्रात शेतकरी सरकार विरोधात आक्रमक

संपूर्ण कर्जमाफीसाठी येवला तालुक्यातील धुळगाव येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन करीत भाजप सरकारचा निषेध केला. शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा तसेच कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर काल झालेल्या आमानुष लाठीमाराचा यावेळी निषेध करण्यात आला. 

Updated: Jun 2, 2017, 11:37 AM IST
उत्तर महाराष्ट्रात शेतकरी सरकार विरोधात आक्रमक title=

नाशिक : संपूर्ण कर्जमाफीसाठी येवला तालुक्यातील धुळगाव येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन करीत भाजप सरकारचा निषेध केला. शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा तसेच कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर काल झालेल्या आमानुष लाठीमाराचा यावेळी निषेध करण्यात आला. 

सटाणा तालुक्यातील जायखेडा येथून गुजरातमध्ये कांदा घेऊन जाणारा ट्रक तरूणांनी अडवला. त्यातील कांद्याच्या गोण्या तरूणांनी रस्त्यावर फेकून दिला.

मनमाडमध्ये शेतकरी संपाच्या दुस-या दिवशी शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतक-यांनी पुणे-इंदौर महामार्गावर रास्ता रोको करून दुध रस्त्यावर ओतलं. यावेळी शेतक-यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.