प्रत्येक वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी, अन्यथा भरावा लागणार दुप्पट टोल

फास्टॅग नाही? मग भरावा लागणार दुप्पट टोल

Updated: Feb 15, 2021, 10:05 PM IST
प्रत्येक वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी, अन्यथा भरावा लागणार दुप्पट टोल title=

मुंबई : वाहनचालकांनो, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. वाहनांवर फास्टॅग लावण्याची मुदत आज रात्री संपणार आहे. त्यामुळं उद्यापासून तुमच्या वाहनावर फास्टॅग नसेल तर तुमच्या तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.  

फास्टॅग नाही? मग भरावा लागणार दुप्पट टोल

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगला पुन्हा मुदतवाढ देण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळं उद्यापासून तुमच्या वाहनावर फास्टॅग स्टिकर नसेल तर त्यांच्याकडून दुप्पट टोल आकारला जाणार आहे. देशातील सर्वच महामार्गांवर वाहनचालकांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे.

टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी स्वयंचलित फास्टॅग यंत्रणा लागू करण्यात आलीय. यापुढं टोलनाक्यावरील सगळ्या लेन फास्टॅग लेन असतील. यामुळं सगळ्या टोल नाक्यांवरील कॅश व्यवहार बंद होतील. टोल नाक्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला टोल भरावा लागेल. प्रत्येक वाहनावर लावलेल्या फास्टॅगची रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजे आरएफआयडी पडताळणी होईल. ज्या वाहनांवर फास्टॅग नसेल त्यांच्याकडून दुप्पट टोल आकारण्यात येईल. 

या नव्या फास्टॅग प्रणालीबाबत वाहनचालकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे तसंच वरळी वांद्रे सी लिंकवर फास्टॅगच्या या प्रयोगाला चांगलं यश मिळतं आहे. त्यामुळं तुम्ही फास्टॅग लावला नसेल आणि भुर्दंड टाळायचा असेल तर आताच जवळची बँक गाठा.