पती-पत्नीच्या वादात चिमुकल्यांचे हाल, निर्दयी बापाने पोटच्या मुलांना अशी दिली शिक्षा

आई-बाबांच्या भांडणात निरागस मुलांची काय चूक?

Updated: May 26, 2022, 05:32 PM IST
पती-पत्नीच्या वादात चिमुकल्यांचे हाल, निर्दयी बापाने पोटच्या मुलांना अशी दिली शिक्षा title=

गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : कोणत्या ना कोणत्या कारणावरुन पती आणि पत्नीमध्ये वाद होत असतात. पण त्याचा नकळत परिणाम मुलांवर होत असतो. अशीच काहीशी घटना वाशिम जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पती-पत्नी झालेल्या वादाची शिक्षा दोन चिमुकल्यांना सहन करावी लागली.

सखाराम जाधव असं या निर्दयी बापाचं नाव आहे. सासरी असलेल्या पत्नीसोबत सखारामचं भांडण झालं. रागातच तो 6 वर्षांचा साहित आणि 8 वर्षांचा आदित्य या दोन मुलांना घेऊन निघाला. पण त्याच्या मनात काही वेगळंच सुरु होतं. सखारामने आपल्या दोन्ही मुलांना घेऊन अकोला पूर्ण पॅसेंटर गाडीने जऊळका रेल्वे स्थानक गाठलं.

जऊळका रेल्वे स्टेशनवर उतरुन त्यांनी दोन्ही मुलांना प्लॅटफॉर्मवर बसवलं. तुमच्यासाठी खाऊ घेऊन असं सांगत सखाराम तिकडून निघाला. पण तब्बल 5 तास उलटूनही वडिल न आल्याने दोन्ही मुलांच्या डोळ्यात अश्रु आले. 

प्लॅटफॉर्मवर असलेल्या पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली. दोन्ही मुलांनी आपले बाबा परतले नसल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांच्या निर्भया पथकाने तात्काळ कारवाई करत चिमुकल्यांच्या वडिलांचा शोध घेतला. 

यानंतर वडिलांचं समुपदेशन करत दोन्ही मुलांना त्यांच्या स्वाधिन केलं.